Napkin Bouquet

director desk

मिस मानसी पोळ

संचालक

मी मानसी पोळ, एक समर्पित , कमवा व शिका यासंकल्पनेने भावलेली मुलगी. मी पिल्लई कॉलेज, पनवेल येथे मास मल्टीमीडिया कम्युनिकेशन्समध्ये पदवी घेतली आहे. वयाच्या 20 व्या वर्षी, मी आधीच एक उद्योजकीय प्रवास सुरू केला आहे, दोन वर्षापूर्वी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अनुभवाची शिदोरी घेऊन मी माझा अभ्याससोबत माझा व्यवसाय वृद्धिंगत करत आहे व माझे उदिष्ठ साध्य करण्यासाठी या संधींचा पुरेपूर उपयोग करण्यास वचनबद्ध आहे
एक व्यावसायिक तरुण व्यावसायिक म्हणून, उत्कृष्ट देण्यासाठी मी कठीबध्द आहे. s नॅपकिन गुलदस्ते मधील पार्श्वभूमीसह, मी स्पर्धाच्या युगामध्ये व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी धोरणात्मक नियोजन, व निर्णय घेण्याचा प्रयत्न करते. मी सतत शिकण्यावर आणि उद्योगाच्या ट्रेंडशी अद्ययावत राहण्यावर विश्वास ठेवतो आणि मला नावीन्य, शाश्वत पद्धती किंवा ग्राहकांच्या समाधानाबद्दल नेहमीच उत्कंठा असते. ग्राहकांशी संपर्क साधणे, त्यांना खरेदीदारांमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रयत्नशील असते.एक तरुण उद्योजक असल्याने मला खूप काही शिकायचे आहे.
मी माझा शैक्षणिक प्रवास सुरू ठेवत असताना, मी “कमवा आणि शिका” ही संकल्पना स्वीकारली आहे. या दृष्टिकोनामुळे ज्ञान आणि व्यावहारिक अनुभवाच्या संपादनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी वैयक्तिक वाढ अनुभवली, मी व्यावसायिक वाढ देखील पाहिली. आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना प्रगत तंत्रज्ञान प्रदान केले आहे
ज्यामुळे आम्हाला बाजाराच्या मागण्या समजून घेण्यात आणि त्यांची पूर्तता करण्यात मदत झाली. हे आमच्या उत्पादनांच्या वाढीव यशात योगदान दिले.
जसजसा आमचा व्यवसाय विस्तारत आहे तसतसा आमचा आत्मविश्वास वाढत आहे. आमची उत्पादन क्षमता वाढवून आम्ही सक्रियपणे महिलांचे सक्षमीकरण करत आहोत.

सौ.सविता पोळ

मालक

जग धावत सुटलंय, त्याला काय हवंय हे माहीत आहे पन ते कशासाठी हवंय व ते दैनंदिन जीवनात त्याचे किती मुल्य(महत्व) किती आहे हे कोरोना कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीस अनुभव आला. पैशाचा अपव्यय व योग्य गुंतवणूक किती महत्वाची आहे हे प्रत्येक व्यक्तीस अनुभवातून समजले. गडगंज संप्पतीवाला ही अडचणीत व सामान्य व्यक्तीही अडचणीत. दैनंदिन गरजा भागवत लाईफस्टाईल ही मेंटेन करण्यात प्रत्येकाने अनुभवाने कोरोना काळात मास्टरी केली म्हटले तर वावगे ठरणार नाही. जो अनुभव प्रत्येकाला आला तोच मलाही आला. आयुष्य सहजसुंदर करताना वापरलेली वस्तु जर आपणास परत वापरायोग्य मिळत असेल तर त्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो बदल फ्लॉवर बुके ते नॅपकिन बुकेमध्ये ग्राहकांनी पारखला.
नॅपकिन बुकेचा सिमीत वापर होत होता व व्हरायटी मार्केट मध्ये कमी होत्या. ते हेरून ग्राहकांना समोर ठेवून S नॅपकिन बुके टिमने निर्मीती केली. मार्केटिंग चा असलेला अनुभव व फॅमिली क्लोथ बिजनेस चा हा व्यवसाय पुढे वाढवण्यास मैलाचा दगड ठरला. ग्राहकाच्या बजेटचा अभ्यास करून कमित कमी किमतीमध्ये S नॅपकिन बुके बनवण्याचा आमचा कल राहिला व उत्तरोत्तर प्रगती होत गेली. यात सर्वात महत्वाचे योगदान राहिले ते आमच्या आत्मनिर्भर भारताच्या आत्मनिर्भर महिलांचा. दीर संदिप पोळ यांचा रूमाल व कच्चा मालाचा प्रदीर्घ अनुभव व पती गोरखनाथ पोळ यांची जीवनदिप प्रकाशन माध्यमातून केलेला 25 वर्षाचा मार्केटिंगचा अनुभव कामी आला.
न्यु जनरेशन ….न्यु आयडिया या युक्तिला अनुसरून मुलगी मानसी हिचे योगदान मोलाचे ठरले. बॅचलर ऑफ मासमल्टिमिडीया कम्युनिकेशन घेत असलेल्या शिक्षणचा मुलीने चफकल वापर करत नॅपकिन बुके मध्ये विविधता आणली. आता आनंद मिळवा समारंभानंतरही ही ओळ तंतोतंत खरी ठरवली. मास्टरमाईंड दिनेश वाघ सरांनी केलेले मार्गदर्शन व संकल्पना प्रत्येक्षात उतरताना बघताना आनंद होतो. मी ही एक गृहिणी आहे व गृहिणी ते यशस्वी उद्योजिका असा माझा प्रवास खरेतर एकत्रकुटुंब पद्धतीचा अवलंब व कौटुंबिक मार्गदर्शनाचा अविभाज्य घटक आहे. परिस्थितीनुरूप येऊ घातलेले बदलांचा स्विकार केला यश निर्विवाद पणे आपणास कवेत घेते हे मी अनुभव घेत आहे.
या सर्व प्रवासात माझ्या आयुष्यात अथांग समुद्राप्रमाणे आलेली आव्हाने लीलया पार कर्ता आली ती फक्त आपण स्विकार केलेल्या S नॅपकिन बुकेचे वापरामुळेच. आव्हाने जी तुम्हाला सातासमुद्रापार घेऊन जातात ती असतात यशस्वीतेकडे घेऊन जाणारी व उत्तुंग शिखरा प्रमाणे आत्मविश्वास मिळवून देणारे मैलाचे दगड. या आत्मविश्वासाच्या जोरावरच आम्ही आपणास येणाऱ्या काळात अजुन वैविध्यपूर्ण नॅपकिन चे बुकेचे निर्माण करू व जे वाजवी किमतीतच ग्राहकापर्यंत मिळतिल असा विश्वास देते. अशिच साथ देणारा ग्राहक वर्ग व S नॅपकिन बुकेच्या समस्त परिवारास धन्यवाद ! वलयांकित करणारे सर्व नॅपकिन बुके निर्माते यांचे ही धन्यवाद!

श्री गोरखनाथ पोळ

प्रेरक

मी Motivator
सर्वाना नमस्कार,
उठा ! जागे व्हा. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे व आपणही त्याचा अविभाज्य घटक आहोत. गरज ही शोधाची जननी असते,’ अशी म्हण मराठी भाषेत आहे. ही म्हण तयार होण्याला कारणही तसंच आहे. आपल्या गरजेपोटीच मानवाने अशक्यप्राय वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा शोध लावला. नॅपकिन बूके त्या पैकीच एक. एखादी बिकट परिस्थितीही मानवाला नवं काही तरी करण्याची प्रेरणा देत असते. प्रत्येक जन आपल्यातला चांगला व्यक्तीशोध करत असतो व कुणालातरी आपला ईष्ठ मानुन आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत असतो.
ईश्वराने प्रत्येकामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपण दिले आहे व त्याला शोधण्याचे त्याला ओळखण्याची कसब/प्रयत्न आपण करत असतो. प्रत्येकाला तो ईश्वरी रस्ता मिळेलच असे नाही. अशा वेळेस अचानक आपल्या समोर येउन कोणी असा रस्ता दाखवतो व आपले नशिब बदलते व आयुष्याला कलाटणी मिळते. परम पुज्य भगवान बुद्ध म्हणतात ” मनुष्य विचारोसे निर्मित प्राणी है, जैसा सोचता है वैसा बन जाता है ” थोडक्यात काय तर आपल्याला त्या चांगल्या विचार धारेत घेऊन येणाऱ्या वाटसरूची मोटिव्हेटर ची (प्रेरक ची ) गरज असते.
आपली जीवनशैली, आपल्या कामाचा परीघ आपल्या विचारांना चाकोरीच्या बाहेर काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. जीवनदिप प्रकाशन च्या माध्यमातून गेली 25 वर्षे शिक्षण क्षेत्रात मार्केटिंग करत असताना अनेक चॅलेंजेस लिलया पार पाडले. उद्याच्या उज्वल भविष्यासाठी हा स्लोगन घेऊन बाहेर पडलेला मी गोरखनाथ पोळ अजुन काहीतरी वेगळे करावे असा प्रयत्न करत होतो व नॅपकिन पासुन बनवले जाणारे बुके व मार्केट च्या मोहात पडलो हे कळलेच नाही.
आई बाबांनी स्वप्ने पहावित व मुलांनी पुर्ण करावीत अशी परिचात म्हण आहे. स्वप्न पहा व सत्त्यात उतरवा हा दिलेला संदेश माझ्या मूलांनी खरा करून दाखवला मूलगी सिद्धीचा टेक्नोसेव्ही सपोर्ट व मूलगी मानसी हिचा निश्चही स्वभाव S नॅपकिन बूकेला मुर्तरूप देऊन गेला. सौ. सविता ही सुद्धा खंबीरपणे प्रो. ची जबाबदारी पार पाडताना ग्राहकांची आवड व निवड संभाळताना सुखावून जातो. चला वास्तविकता समजून घेऊया आणी S नॅपकिन बूकेचे स्विकार तर केला आहेच तो अधिक वृद्धिंगत करूया.
Scroll to Top